लांजा (संजय साळवी) - मराठा समाजातील युवक-युवतींना रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणार्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासन स्तरावर येणार्या अडचणी दूर करून अधिक सक्षम बनवावे, अशी मागणी लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने लांजा तहसीलदार यांच्या मार्फत शासनाकडे करण्यात आली. लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी समाजातील विविध शासकीय सवलतींचा लाभ मराठा समाजाला मिळावा यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र मराठा समाजातील अल्पशिक्षित व व्यवसाभिमुख असा मोठा वर्ग हा स्वयंरोजगारावर अवलंबून आहे. अशा मराठा समाजातील युवकांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणार्या माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे खुप फायदेशीर ठरत आहे.
या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर उल्लेखनीय असे काम करत एक लाखांहून अधिक मराठा उद्योजक घडविले असून हजारो कुटुंबाना आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. महामंडळाचे कामकाज डिजिटल माध्यमातून मराठा समाज बांधवांना मोबाईल ऍपद्वारे उपलब्ध करुन दिले आहे. या महामंडळाला नुकताच ३०० कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र अलीकडच्या काळात महामंडळाच्या कामकाजात अनेक आर्थिक व प्रशाकीय अडचणी निर्माण झाल्याने मराठा समाजातील युवक - युवतींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. याबाबत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे समाजाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवत आहेत.
मात्र शासन त्यांच्या या मागणीकडे म्हणावे तसे गांभिर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या महामंडळाच्या एकूणच भवितव्याबाबत मराठा समाजातातून चिंता व्यक्त केली जात असून महामंडळ हळू - हळू बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची भावना मराठा समाजातील युवक - युवतींमध्ये निर्माण झाली आहे. तरी या सार्या गोष्टींचा विचार करून शासनाने मराठा समाजासाठी असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर भेडसावणार्या अडचणी दूर करण्याची मागणी या निवेदनात शेवटी करण्यात आली आहे. दरम्यान, सदरचे निवेदन देताना लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे, उपाध्यक्ष शरद चव्हाण, समीर सावंत पदाधिकारी अविनाश उर्फ राजू जाधव, संजय साळवी, स्वप्ना सावंत यांच्यासह गुरुप्रसाद देसाई, अनंत उर्फ बापू जाधव उपस्थित होते.































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.