loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जतमध्ये विभाजनाच्या वेदनांचे स्मरण; डेक्कन जिमखाना ते लोकमान्य टिळक चौक शांतता मोर्चा!

कर्जत (जयेश जाधव) - भारताच्या फाळणीदरम्यान झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच विस्थापनाच्या वेदनादायी आठवणींना उजाळा देण्यासाठी आज (१४ ऑगस्ट) ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून डेक्कन जिमखाना परिसरातून लोकमान्य टिळक चौकापर्यंत शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डेक्कन जिमखाना येथे नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, डेक्कन जिमखाना ते लोकमान्य टिळक चौक असा शांततेत मोर्चा काढण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फाळणीच्या काळात झालेली जीवितहानी, विस्थापन आणि असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या दुःखद जखमा या इतिहासाचा काळा अध्याय आहेत. या वेदनादायी इतिहासाचे स्मरण करून भविष्यात समाजात एकता, बंधुभाव आणि शांतता कायम राहावी, असा संदेश मोर्चातून देण्यात आला. मोर्चात ‘वेदना, विस्थापन आणि मीठ जखमा इतिहासाची काळी पाने कधीही विसरता कामा नये’ अशा आशयाचे विविध घोषवाक्य असलेले बॅनर झळकविण्यात आले. नागरिकांनी शांततेत सहभागी होत फाळणीतील पीडितांना आदरांजली वाहिली. या मोर्चाचा समारोप लोकमान्य टिळक चौकात करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg