loader
Breaking News
Breaking News
Foto

जीवन गौरव पुरस्काराबद्दल ग्रामपंचायतीत जेष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांचा सत्कार

संगमेश्वर - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फणसवणे गावचे ग्रामस्थ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सत्यवान विचारे यांना प्राप्त झालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल ग्रामपंचायत फणसवणे-वाडावेसराड आणि ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला. चैतन्य आर्ट चिपळूण या संस्थेच्या वतीने सत्यवान विचारे यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक, पत्रकारिता व समाजोपयोगी कार्याची दखल घेत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सरपंच उषाताई गुरव, उपसरपंच नंदकुमार नागवेकर, माजी उपसरपंच हनीफशेठ वलेले, फणसवणे विभागाचे मंडळ अधिकारी कदम, तलाठी जाधव, र. दी. गार्डी विद्यालयाचे माजी चेअरमन रवींद्र नागवेकर, पोलीस पाटील संजय नागवेकर, गावचे मानकरी प्रभाकर विचारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल सलाम लांबे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच बहुसंख्य ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल सत्यवान विचारे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या कार्याची गावकऱ्यांनी घेतलेली दखल ही पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg