loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्योती रामदास कदम यांना ‘आदर्श माता पुरस्कार २०२६’

खेड (प्रतिनिधी) : सामाजिक कार्य, कर्तृत्व आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सन २०२६ चा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ज्योती रामदास कदम यांना ३ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून यावर्षी ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करण्याचे आयोजन करण्यात आले असून, आपल्या सामाजिक कार्याचा, कर्तृत्वाचा आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार स्वीकारावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ही संस्था सन २०१४ पासून शैक्षणिक, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, समाजाभिमुख मूल्यांची जपणूक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, सध्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सअंतर्गत १८ हजारांहून अधिक विद्यार्थी, ८०० हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ४० हून अधिक शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत. विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्था कार्यरत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

‘आदर्श माता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्याचा कार्यक्रम ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस, जाधवर चौक, मानाजीनगर, नऱ्हे, पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg