loader
Breaking News
Breaking News
Foto

देशभक्तीचा जयघोष, तिरंग्याचा अभिमान, रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन सोहळा दिमाखात साजरा

खेड (प्रतिनिधी) - शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात संपन्न झाला. ’वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने ध्वजारोहणाच्या राष्ट्रीय सोहळ्याची मंगलमय सुरुवात झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक 7.45 वाजता बिगुलाच्या तालावर ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर करून ध्वजनिष्ठ प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी उपस्थितांच्या शिवगर्जनेने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी तालबद्ध संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले व उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेले माजी सैनिक राम ढेरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी गौरी जाधव, अवनी मराठे, पूर्वी बेले, सान्वी मांचेकरसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे सादर केली. तसेच देशभक्तीपर गीतावर कवायत संचलन, ’जयोस्तुते’ हे देशभक्तीपर गीत तसेच ’वंदे मातरम्’ या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सर्वांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले यांना आभारपत्र देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रो. जोगेश साडविलकर, रो. संतोष गिल्डा, रो. अभय तलाठी, रो. शेखर तलाठी, रो. विश्वास सोमण, रो. निरंजन दळी, रो. लक्ष्मीकांत पटेल, रो. वैभव जैन, रो. संतोष गिल्डा, रो. आदित्य गांधी, रो. संकेत बुटाला, रो. अमित लढ्ढा, रो. सुयोग बेडेकर, रो. जे. करूणाकरण, रो. डॉ. समीर मंडपे, रो. कुणाल पाटणे, रो. समीर पाटणे, रो. सलील गांधी, रो. डॉ. अंकित मोरे, देवळेकर, उच्चमाध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, पूर्वमाध्यमिक विभागप्रमुख देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी शर्वरी सावर्डेकर, आर्या खेडेकर व आर्या जाधव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg