loader
Breaking News
Breaking News
Foto

वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना गाडीवरील ताबा सुटून अपघात, दुचाकीस्वार पुलाखाली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने अति वेगाने जात असताना गाडीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार पुलाखाली कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. सावंतवाडी मठ मार्गे वेंगुर्ले रस्त्यावरील कांबळेवीर हायवे ब्रीजलगत नेमळे तिठ्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराला स्थानिकांनी पूला खालून वर आणत उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. विशाल सावंत असे त्याचे नाव असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे. सदरचा युवक हा आपल्या ताब्यातील पॅशन प्रो दुचाकीने वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने येत होता. सावंतवाडी वेंगुर्ले रस्त्यालगत नेमळे तिठा येथे एक छोटासा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पूलावर असलेल्या रेलिंगच्या बाजूने सदर दुचाकीस्वार थेट पुलाखाली जाऊन पाण्यात कोसळला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पायाला व डोक्याला मार लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला पुलाखालून वर आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेला प्राचारण करून त्याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून तो बेशुद्धावस्थेत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी त्याने आपले नाव विशाल सावंत असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्याकडे मोबाईल तसेच ओळख पटविणारी कोणतीही वस्तू नसल्यामुळे त्याचा नेमका पत्ता सापडला नाही. तसेच त्याच्या गाडीवर देखील दोन्ही बाजूचा नंबर प्लेट नव्हत्या. त्यामुळे तो नेमका कोण व कुठचा याचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. या अपघाताबाबत अद्याप सावंतवाडी पोलिसात कोणतीही नोंद नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg