सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे गावचे सुपुत्र आणि सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्युरो), मुंबई येथे पोलीस उप अधीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रशांत प्रतिभा बाळकृष्ण सावंत यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाचे सन २०२६ चे ’अति उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या पुरस्कारामुळे कसवण तळवडे गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
प्रशांत सावंत यांनी बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पोलीस गणवेशाबद्दल असलेल्या विशेष आकर्षणापोटी सन १९९६ मध्ये ’पोलीस शिपाई’ म्हणून सेवेत प्रवेश केला. नोकरीत असतानाच त्यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर चझडउ परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. अभ्यासातील चिकाटी, उत्कृष्ट गुण आणि क्रीडा क्षेत्रातील (क्रिकेट व फुटबॉल) अनुभवाच्या जोरावर त्यांनी मैदानी परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण होऊन ’पोलीस उपनिरीक्षक’ पदी थेट निवड मिळवली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथून खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग टिळकनगर पोलीस ठाणे, चेंबूर (मुंबई) येथे झाली. त्यानंतर २०१३ मध्ये मुंबई क्राईम ब्रँच, सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीनंतर नवी मुंबई आणि पुढे दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदार्या सांभाळल्या. २०२१ मध्ये पुन्हा मुंबई क्राईम ब्रँच आणि २०२४ मध्ये पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उप अधीक्षक पदावर पदोन्नती मिळवून सध्या ते अँटी करप्शन ब्युरो, मुंबई येथे कार्यरत आहेत.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.