loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी येथे १६ ऑगस्टला वारकरी संप्रदायाची नियोजन बैठक

सावंतवाडी (प्रतिनिधी) - पारायण, हरीपठण आणि प्रवचनांच्या माध्यमातून भाविकांना भक्तीमार्गावर नेण्यासाठी सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आगामी कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी येत्या रविवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भटवाडी येथील धनश्री मंगल कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर एकत्र येऊन पुढील उपक्रमांचे नियोजन करणार आहेत. या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व वारकरी बंधू-भगिनींनी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सिताराम सावंत, उपाध्यक्ष ह.भ.प. विलास राणे,कार्याध्यक्ष ह. भ. प. शाम कुंभार आणि सचिव ह.भ.प.प्रकाश केळुसकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg