दापोली (चंद्रशेखर जोशी) : एसटीमधून प्रवास करणार्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारे तिला स्पर्श करणार्या एका युवकाला दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जुलै रोजी सायंकाळी ५.४५ चे सुमारास एक विद्यार्थिनी खेड ते मंडणगड एसटी बस मधून प्रवास करत होती. तिचे गाव आल्यावर ती त्या बसमधून उतरण्यासाठी येत असताना संशयित दिपेश दिलीप तांबे याने या विद्यार्थिनीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारे तिला स्पर्श केला.
घरी गेल्यावर या विद्यार्थिनीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी दापोली पोलीस ठाण्यात ३१ जुलै रोजी येवून संशयित दिपेश दिलीप तांबे (वय ३३) रा. भाटघर, ता. दापोली याचे विरोधात तक्रार दिली. दापोली पोलिसांनी संशयित दिपेश तांबे याचे विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ७५ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल केल्यापासून संशयिताचा पोलीस शोध घेत होते, मात्र तो सापडत नव्हता. अखेर काल रात्री त्याला पकडण्यात दापोली पोलिसांना यश आले. आज त्याला खेड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुर्जा हिरेमठ करत आहेत.

1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.