loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने निवृत्त सैनिकांचा सन्मान; देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वीरांना मानवंदना

रत्नागिरी : 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावणाऱ्या निवृत्त सैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ध्वजारोहण नाही, तर ज्यांनी रक्त सांडून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले त्या वीरांचे ऋण स्मरण करण्याचा दिवस आहे. या भावनेतून भाजप रत्नागिरीने दोन जवानांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सदानंद बाळकृष्ण सावंत आणि सुरेश सखाराम राणे या दोन निवृत्त सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात दोन्ही सैनिकांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगितले. सीमेवरील कठीण प्रसंग, देशभक्ती आणि कर्तव्याची जाणीव त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. भाजपाने केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सैनिकांच्या त्यागाला सलाम केला आणि सांगितले की, "देश सुरक्षित आहे तो पर्यंत हे सैनिक सुरक्षित आहेत. त्यांचा सन्मान ही आमची जबाबदारी आहे." या कार्यक्रमाच्या वेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस व नगरसेवक संदीप सुर्वे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, हर घर तिरंगा संयोजक संतोष सावंत, प्रज्ञा टाकळे, सचिन गांधी, शमी हर्चेकर, ययाती शिवलकर आदि. उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg