loader
Breaking News
Breaking News
Foto

नव्याने नियुक्त झालेले दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकार्‍यांचे केले स्वागत

संगलट (खेड), (इक्बाल जमादार) - दापोली नगरपंचायतीमध्ये नव्याने नियुक्त झालेले मुख्याधिकारी महेश धुमाळ यांचे नगरसेवक संदीप चव्हाण तसेच माजी नगराध्यक्षा व नगरसेविका ममताताई बिपिन मोरे यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी दापोली शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. नवीन मुख्याधिकार्‍यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देताना शहराच्या विकासासाठी प्रशासनाने लोकाभिमुख भूमिका घेऊन नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या सदिच्छा भेटीमुळे दापोली शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg