खेड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२५ अंतर्गत विभागस्तरावर प्रथम तसेच राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील ज्योती रामदास कदम यांच्या सामाजिक व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर (भा.व.से.) यांनी त्यांना विशेष प्रशंसापत्र पाठवून गौरव केला आहे.
या प्रशंसापत्रात ज्योती कदम यांनी केलेले कार्य मोलाचे, प्रेरणादायी आणि समाजासाठी दिशादर्शक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी प्रामाणिकपणे, स्वयंप्रेरणेने व सद्हेतूने केलेल्या कार्यामुळे त्या वनश्री पुरस्कारासाठी खऱ्या अर्थाने पात्र ठरल्याचे गौरवोद्गार प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहेत. प्रशंसापत्रात त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करत भविष्यातही याच समर्पणाने, जिद्दीने आणि उत्कटतेने समाज व पर्यावरणासाठी कार्यरत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळालेले हे प्रशंसापत्र म्हणजे ज्योती कदम यांच्या पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याला मिळालेली महत्त्वाची शासकीय पावती मानली जात आहे. यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव आणखी उंचावला असून मंडणगड तालुका व रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. वनसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या ज्योती कदम यांच्या कार्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशामुळे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.