loader
Breaking News
Breaking News
Foto

पन्हळी खुर्द पुलाचा भराव उखडला; संरक्षक कठडयाचे खांबही वाहून गेले

मंडणगड (प्रतिनिधी) - पन्हळी खुर्द गावाकडे जाणार्‍या मार्गावरील एका छोट्या पुलाला जोडणार्‍या एका बाजुकडीलभराव वाहून गेला आहे तसेच पुलावर असलेल्या आधारासाठीच्या संरक्षक कठडयाचे खांब वाहून गेल्याने या पूलावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल पंचक्रोशीतील महत्वाचे गाव असलेल्या पन्हळी खुर्द या गावात जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील चिंचाळीकडून वाहत येणार्‍या येथील नदीवरील छोट्या पुलाचा भराव उखडला असून पुलावरील संरक्षक कठडयाचे खांबही वाहून गेल्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. कारण जरा जरी पाऊस झाला तरी नदीला येणार्‍या पुराचे पाणी हे पुलावरून वाहू लागते. मातीमिश्रीत गढुळ वाहणा-या पाण्यामुळे पुल आणि नदी पात्र अजिबातच समजुन येत नाही त्यातच पुलावरील संरक्षक कठडयाचे खांबही वाहून गेले आहेत त्यामुळे पुलाच्या मार्गाचा नेमका अंदाज येत नाही तसेच एका बाजूचा भराव उखडला असल्याने येथील वाहतूक मोठी धोक्याची झाली आहे. पन्हळी खुर्द गावातील रहीवाशांना आपल्या गावाकडील घराकडे जाणारा असा हा एकमेव मार्ग असल्याने समस्या अधिक तीव्र बनली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg