loader
Breaking News
Breaking News
Foto

संगम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एस.टी. सवलत कार्डांचे वितरण

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगम ज्येष्ठ नागरिक संगमेश्वर संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेल्या एस.टी. सवलत कार्डांचे वितरण शुक्रवारी संगमेश्वर येथील शारदा ग्रंथालयात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. दिवसभरात तब्बल ३०० कार्डांचे वितरण करण्यात आले. सकाळी १०.३० वाजल्यापासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू होती. ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. प्रवासासाठी सवलतीचा लाभ मिळावा आणि कार्ड मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी संघाच्या पदाधिकार्‍यांनी विशेष नियोजन केले होते. यावेळी एस.टी.चे प्रतिनिधी दीपक तराळे, संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेटये, उपाध्यक्ष उदय संसारे, कोषाध्यक्ष जनार्दन शिरगावकर, तसेच श्रीप्रकाश कोळवणकर, विनय मुरकर, विनायक पाथरे, शारदा ग्रंथालयाच्या अध्यक्षा सिद्धी पाथरे आणि श्वेता खातू यांनी कार्ड वितरणाचे काम सुरळीत पार पडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg