loader
Breaking News
Breaking News
Foto

सलग सातव्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्ष अध्यक्षपदी रोहन धोत्रे

दापोली (प्रतिनिधी) : ग्रुप ग्रामपंचायत चिखलगांव देवके अंतर्गत झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीची निवड करण्यात आली. या सभेत समितीच्या अध्यक्षपदी रोहन तुळशीराम धोत्रे यांची सलग सातव्यांदा निवड करण्यात आली आहे. रोहन धोत्रे हे दापोली खरेदी विक्री संघाचे माजी संचालक असून, देवके करजगाव धरण समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते मच्छीमार सोसायटीचे माजी सदस्य आहेत. याशिवाय, त्यांनी दापोली तालुका रोजगार हमी योजनेमध्येही सक्रिय भूमिका बजाविली आहे. विविध सामाजिक व ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. ग्रामस्थांच्या एकमताने रोहन धोत्रे यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सलग सातव्यांदा निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दलच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून, गावातील तंटे सामोपचाराने मिटवून गावात शांतता व सलोखा राखण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg