वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनातून संशयास्पदरीत्या फिरून विविध वस्तूंची विक्री करणार्या तिघांना खांबाळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती संबंधित तिघांवर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करून गुरुवारी सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये चारचाकी वाहनातून काही व्यक्ती फिरत असून घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच या व्यक्तीकडून काही नागरिकांची फसवणूक झाल्याची चर्चा परिसरात होती.
त्यामुळे पोलिसांनी तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांना पोलीस पाटलांमार्फत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, खांबाळे येथील ग्रामस्थांना चारचाकी वाहनातून फिरणारे तिघे संशयास्पदरीत्या आढळून आले. ग्रामस्थांनी त्यांना हटकून याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये जीवन पोपट कुंभार (रा.पन्हाळा, जि.कोल्हापूर), सुप्रिया समीर पाटील (रा.कोल्हापूर) आणि रुक्सना अमीर मेस्त्री (रा.कळंबा, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ते घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करीत असल्याचे समोर आले. मात्र गावांमध्ये फिरून वस्तू विक्री करण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तिघांना तहसीलदार कार्यालयात हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना योग्य तो समज देऊन गुरुवारी सायंकाळी उशिरा त्यांना सोडून देण्यात आले.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.