loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतीक कपाडिया यांची दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून निवड

गुहागर (संदेश कदम) - गुहागर दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतीक कपाडिया यांची दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर म्हणून यथोचित निवड झाली आहे. प्रतीक कपाडिया यांनी गुहागर येथे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे काम पाहिले आहे. त्यांच्या याच न्यायप्रिय आणि कौतुकास्पद कार्यपद्धतीची दखल घेत, आता त्यांची दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर या उच्च पदावर निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोठ्या यशाबद्दल गुहागरमधील नामवंत अ‍ॅडव्होकेट स्मिता कदम आणि गुहागर लीगल एड (Legal Aid) यांच्या वतीने कपाडिया साहेबांचे मनःपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. कपाडिया यांनी आपल्या न्यायिक कारकिर्दीत नेहमीच न्यायाचा आणि उत्कृष्टतेचा दर्जा राखला आहे. त्यांच्या पुढील उज्ज्वल, गौरवशाली आणि निरंतर यशस्वी भविष्यासाठी संपूर्ण गुहागर कायदेतज्ज्ञ मंडळ यांच्याकडून त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg