loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड युवासेना तालुका अध्यक्ष विकास पवार यांचा सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील आंबवणे खुर्द येथील रहिवासी आणि सामाजिक राजकीय उद्योग व्यवसाय क्षेत्रातील एका यशस्वी युवा कार्यकर्त्याची शिवसेनेच्या युवा सेना तालूकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विकास पवार यांचा मंडणगड तालुक्यातील अगदी ग्रामीण भागात असलेला दांडगा लोकसंपर्क, उत्कृष्ट संभाषण कौशल्य, एक उत्तम संघटक असलेल्या आणि युवा वर्गात असलेली छाप पाहता ते मंडणगड तालुक्यातील युवा सेना संघटन अधिक भक्कम करतील असा शिवसेना परिवाराला विश्वास आहे. योग्य शिवसैनिकांची योग्य पदावर झालेल्या या नियुक्तीचे शिवसेना गटात समाधान व्यक्त केले जात आहे. या नियुक्तीचे मंत्रीमहोदय योगेश कदम यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सौभाग्यवती श्रेया कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg