खेड - (प्रतिनिधी)- रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये भाभा परमाणु संशोधन केंद्र येथील एक सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविकांत आळतेकर यांचे मार्गदर्शनपर सेमिनार उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सदरच्या मार्गदर्शनपर शिबीराची सुरूवात प्रमुख मार्गदर्शक डॉ. रविकांत आळतेकर, रोटरी अकॅडमी महाडच्या विभागप्रमुख सौ. विजया पाटेकर यांचे पूर्वमाध्यमिक विभागप्रमुख सौ. देवयानी महाजन व पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व रोपटे देवून करण्यात आली.
डॉ. रविकांत आळतेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, उदयोन्मुख भारतासाठी तयार केलेली, डिजिटल स्वरूपातील आणि सर्वात मोठ्या विज्ञान-गुणवत्ता शोध परीक्षांपैकी एक असलेली विज्ञान मंथन परीक्षा विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वृत्ती जोपासण्यास प्रोत्साहित करते. विद्यार्थी विज्ञान मंथन हा विज्ञान भारतीद्वारे एनसीइआरटी आणि एनसीएसएम यांच्या सहकार्याने राबविला जाणारा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची लोकप्रियता वाढवणे आणि वैज्ञानिक अभिरुची असलेल्या तरुण प्रतिभावंतांना शोधणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी हा या परीक्षेचा मुख्य हेतू आहे. शिबीरादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. डॉ. रविकांत आळतेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे सविस्तर निरसन केले. संस्थेचे चेअरमन मा. डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या मार्गदर्शनपर शिबीरास शुभेच्छा दिल्या.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.