loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगडमध्ये तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी) - ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरी तिरंगा फडकविण्यासह ‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देवगड शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या तिरंगा बाईक रॅलीमध्ये तहसील कार्यालय देवगड, पंचायत समिती देवगड, पोलीस स्टेशन देवगड तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या सहभागींच्या उपस्थितीमुळे देवगड शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाप्रती सन्मान व्यक्त करावा, तसेच स्वातंत्र्यदिनाचा उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तिरंगा बाईक रॅलीमुळे देवगडमध्ये देशभक्तीचा उत्साह संचारला असून, ‘हर घर तिरंगा’ अभियानाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg