loader
Breaking News
Breaking News
Foto

इको फ्रेंडली नागोबांची विक्री; जामसंडे कावलेवाडीच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा उपक्रम

देवगड (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यातील जामसंडे-कावलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नागपंचमीनिमित्त इको फ्रेंडली नागोबा तयार करून त्यांची देवगड येथील शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात विक्री केली. पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित वस्तूंची विक्री करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इको फ्रेंडली नागोबांना बाजारात चांगली मागणी मिळाली. अवघ्या काही तासांतच सर्व नागोबांची विक्री झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमाची माहिती मिळताच विविध शासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या कलाकृतींची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकवर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणाबाबत जागरूकता तसेच स्वयंरोजगाराची भावना निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg