श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल भोसले नॉलेज सिटी परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ऍड.अस्मिता सावंत भोसले यांनी विद्यापीठाच्या विधी व कायदेविषयक अध्ययन शाखेअंतर्गत कायदेविषयात पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय 'महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांमधील किशोरवयीन गुन्हेगारीचा तुलनात्मक अभ्यास' असा होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील किशोरवयीन गुन्हेगारीची कारणे, स्वरूप, प्रवाह, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच किशोर न्याय व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनात मांडला.
यात किशोरवयीन गुन्हेगारीवर परिणाम करणारे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक व सांस्कृतिक घटक तसेच पुनर्वसनाच्या विविध उपाययोजनांचा सखोल विचार करण्यात आला आहे. संशोधनातून जोखीमग्रस्त युवकांसाठी शिक्षण, मानसिक आरोग्य सहाय्य, कौशल्यविकास आणि प्रभावी पुनर्वसन व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. ऍड.अस्मिता सावंत भोसले यांच्या पीएचडी संशोधनासाठी डॉ.सिमरन सिंग यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावली. तसेच विभागप्रमुख डॉ. सुनील कुमार पांडे यांच्या मार्गदर्शन व शैक्षणिक परीक्षणातून या संशोधनाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार त्यांच्या पीएचडीच्या अंतिम मुलाखतीचा टप्पा २० जुलै रोजी पार पडला. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवीसाठी पात्र घोषित करणारी अधिसूचना जारी केली आहे.
कायदा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऍड.अस्मिता सावंत भोसले यांच्या या उल्लेखनीय यशामुळे श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे संचालक मंडळ, भोसले नॉलेज सिटी परिवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक व कायदेविषयक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.