loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरात सुलभ शौचालय नसल्याने मोठी गैरसोय, सुलभ शौचालय केव्हा होणार? जनतेतून सवाल

केळंबे-लांजा- (सिराज नेवरेकर)- लांजा शहर मुबई- गोवा हायवेवर वसलेले आहे. शहराची लोकसंख्याही दिवसेदीवस वाढत आहे. निसर्ग सौदर्याने नटलेल्या लांजा शहरात एक शौचालय नाही. ही बाब गंभीर असून आश्चर्यकारक आहे. तालुक्यासह सर्व नागरीकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लघुशंकेला जायचे कुठे? हा प्रश्न नागरीकांना सतावत आहे. महिला वर्गाची तर मोठीच कुचंबना होत आहे. हगणदारी मुक्त गावे झाली. मात्र लांजा शहरात साधी मुतारी नाही, याबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माणसाच्या आरोग्यासाठी सुरक्षेसाठी, सन्मानासाठी शौचालय अत्यंत महत्वाचे आहे. रोगराई टाळणे, महीलांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी शौचालयाची गरज असल्याचे बोलले जात आहे. लांजा शहरात हायवेला लागून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आले होते. सदरचे शौचालय हायवेच्या रुंदीकरणात गेल्यामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये कोसळण्यात आले आहे. तिथे आता नवीन सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. ते केव्हा? त्याची अद्याप कार्यवाही नाही. मात्र या सुलभ शौचालयाचा तालुक्यातून शहरात येणार्‍या लोकांसाठी मोठा उपयोग होत होता. आता सुलभ शौचालय नसल्यामुळे महिला, मुले, ग्रामस्थ यांची मोठी गैरसोय झाली आहे. लोकांना लघुशंकेला जायला कुठे व्यवस्था नाही. कुठेतरी आढोशाचा आधार घेऊन लघुशंका करावी लागत असल्याने शहरात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. सुमारे आठ महिने झाले तरी या सुलभ शौचालयाचा प्रश्न मार्गी लागत नाही. याबद्दल जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लांजा शहरात साधी मुतारीची तरी व्यवस्था केली जाईल का? असा सवाल जनतेतून केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg