दापोली (सागर गोवळे) : कृषि महाविद्यालय,येथील ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 'बिजांकूर' गटातर्फे मुगीज (जि. रत्नागिरी) येथे भात पिकात युरिया-डीएपी ब्रिकेट्सच्या वापराबाबत शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. नीता शिगवण यांच्या शेतात पार पडलेल्या या प्रात्यक्षिकात गावातील १० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने युरिया वापरल्यामुळे होणारे नत्राचे बाष्पीभवन, झिरपणे व वाहून जाणे यांसारखे तोटे समजावून सांगण्यात आले. त्यानंतर ३४% नत्र (N) व १८% स्फुरद (P₂O₅) असलेल्या युरिया-डीएपी ब्रिकेट्सचे महत्त्व पटवून देण्यात आले.
भात रोपलागवडीनंतर ७ ते १० दिवसांनी, चार रोपांच्या मधोमध ७ ते १० सेंमी खोलीवर ब्रिकेट्स खोलवर खोचाव्यात. एका गुंठ्यासाठी सुमारे ६२५ युरिया-डीएपी ब्रिकेट्स पुरेशा ठरतात. ब्रिकेट्स जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा साचलेल्या पाण्यात न टाकता मुळांच्या परिसरात खोलवर द्याव्यात. ब्रिकेट्स मुळांजवळ खोलवर दिल्याने खत हळूहळू वितळते व पिकाला योग्य प्रमाणात उपलब्ध होते. खताचा अपव्यय टळतो आणि खतांच्या फेऱ्या कमी झाल्याने श्रम व वेळेची बचत होते. मुळांची व फुटव्यांची सशक्त वाढ होऊन भाताच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.
प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांनी ब्रिकेट्सची स्थापना, योग्य खोली व प्रमाणाबाबत विचारलेल्या शंकांचे तज्ज्ञांनी निरसन केले. हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ अस्लम डोसानी तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.