loader
Breaking News
Breaking News
Foto

ह.भ.प. नंदकुमार लिंगायत महाराज यांची कीर्तन सेवा महाराष्ट्र वारकरी संस्थेच्या संगमेश्वर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

संगमेश्वर (मकरंद सुर्वे)- संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील ह. भ. प. नंदकुमार धोंडू लिंगायत यांची निरपेक्ष कीर्तन सेवा महारासष्ट्र वारकरी संस्थेच्या संगमेश्वर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ह.भ.प.नंदकुमार लिंगायत यांचे तुरळच्या वतीन गेले अनेक वर्षे संप्रदायाला एकत्रीत करण्यात मोठे योगदान आहे. तसेच ते वारकरी संप्रदाय तुरळचे अध्यक्ष आहेत. तसेच ते तालुका वारकरी संप्रदाय उपाध्यक्षही असून वारकरी संप्रदाय संपूर्ण तालुकाच्या वतीने विविध धार्मीक कार्यक्रम पार पाडत असतात.दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार मुरादपूर ते मार्लेश्वर पायी दिंडी तसेच दरवर्षी सर्वानुमते ठरविण्यात येणार्‍या तालुक्याच्या एका गावात एकदिवशीय एक्का हा कार्यक्रम राबवून त्या कार्यक्रमात प्रवचन हरिपाठ व कीर्तन असा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गृपमधील वारकरी बंधूंच्या सहकार्याने अनेक गावातील आयोजित धार्मिक कार्यक्रमात हरिपाठात अभंग, प्रवचन ओव्या सादर करून प्रत्येक गोष्टीचे साध्या सोप्या भाषेत गावातील तमाम जनतेला सहज कळेल अशा प्रकारचे उदबोधन करत असतात. जेणे करून संतांनी दिलेली शिकवण, आचार, विचार, संस्कार अशा गोष्टींच्या उदाहरणातून तरुण पिढी अशा वारकरी संप्रदायाकडे वळली पाहिजे. व अनेक संत, विठोबा रखुमाई, पंढरपूर तीर्थक्षेत्र आदींची महती प्रत्येकाच्या स्मरणात रहावी. त्यासाठी लिंगायत कायम सातत्य राखून इतर वारकरी बांधवांना सोबत घेऊन जनसेवा करत असतात. ह.भ.प. लिंगायत यांची वारकरी संप्रदाय संगमेश्वर तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल तालुक्यातील अनेक मान्यवर व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg