loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएम मोदी रात्री झोपत नसतील, राहुल गांधी यांनी जंतर-मंतर पासून चीन आणि इराण प्रकरणी पुन्हा केंद्र सरकारला घेरले !

नवी दिल्ली : संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मोठा शाब्दिक हल्ला चढविला आहे. गुरुवारी सायंकाळी राजधानी नवी दिल्ली येथे रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी म्हटले की काँग्रेस पार्टी आणि विरोधी पक्ष आता थांबण्यातले नाहीत. त्यांनी असा दावा केला आहे की काँग्रेस पार्टी कोणताही हिंसाचार न करता किंवा कोणाशी वैर न धरता भारतीय संस्कृतीला वाचवण्याच्या लढाईत उतरली आहे.आपण अशा विदुषकांसमोर लढत आहोत ज्यांना फिलॉसॉफी किंवा भारताचा इतिहास माहितीच नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दरम्यान राहुल गांधी यांनी असाही दावा केला आहे की पीएम नरेंद्र मोदी रात्री झोपत नसतील ,भाजपाचे चाणक्य अमित शहा संसदेच्या सदनात येण्यापासून दूर राहतात असे पहिल्यांदा घडले आहे , ते भारतातील लोकांची अभिव्यक्ती पाहत आहेत. त्यांनी असे म्हटले की पीएम नरेंद्र मोदी राजीनामा देत नाहीत आणि अमित शहा दूर हटत नाहीत तोपर्यंत त्यांना झोप येणार नाही . राहुल गांधी असेही म्हणाले की काँग्रेस पार्टी पीएम मोदी आणि अमित शहा यांना आपली जागा दाखवून देईल.राहुल गांधी यांनी दावा केला की भाजपाच्या लोकांना भारत समजलाच नाही. भारताला समजण्यासाठी 3000 वर्ष जुना इतिहास आपण पाहू शकत नाही , आपल्याला आजचा भारत ओळखावा लागेल.

टाइम्स स्पेशल

राहुल गांधी म्हणाले पश्चिम एशियामध्ये युद्ध झाले. इराण आमचा मित्र होता अमेरिका आमचा मित्र होता आणि रशिया ही आमचा मित्र आहे आम्हाला पुढे होऊन यामध्ये महत्त्वाची भूमिका घेण्याची गरज होती , मात्र आम्ही करू शकलो नाही त्याऐवजी पाकिस्तानने आमची जागा घेतली. पाकिस्तान मध्यस्ती झाला आणि पीएम नरेंद्र मोदी पाहत राहिले. अरुणाचल प्रदेश मध्ये काही ठिकाणी चीनने भारतीय जमिनीमध्ये पाऊल टाकले आहे तरी पीएम मोदी यांचे सरकार सांगते की कोणत्याही प्रकारे जमिनीवर कब्जा नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg