संगलट (खेड), (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील केळशी गावाकरिता मंजूर असलेली जलजीवन मिशन पाणी योजना आज अनेक महिने अर्धवट अवस्थेत निधी अभावी पडून आहेत. या योजनेकरिता निधी उपलब्ध करून मिळावा व योजना लवकरात लवकर पूर्ण करून मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केळशी येथील ग्रामस्थ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करणार असल्याची माहिती केळशीचे माजी उपसरपंच केदार पतंगे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांची संयुक्त महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन हर घर, जलही योजना केळशी गावाकरिता मंजूर असून पन्नास टक्के काम पूर्ण होऊन जवळपास दीड वर्ष ही योजना अर्धवट अवस्थेत पडून आहे. याबाबत शासनाकडे व स्थानिक पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार चौकशी केली असता निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात येते. ही नळपाणी योजना अपूर्ण असल्याने यावर्षी स्थानिक नागरिकांना एप्रिल ते जून या तिन महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. व अखेर टँकरने पाणी विकत घ्यावे लागले आहे. तरी केळशी गावाकरिता असणारी ही महत्वाकांशी नळपाणी पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करून केंद्र सरकारचे हर घर जल हे उद्दिष्ट पूर्ण व्हावे व नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा याकरिता अखेर नाईलाजास्तव १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दापोली तहसीलदार कार्यालयासमोर केळशी गावचे ग्रामस्थ एकदिवशीय उपोषण करणार आहेत. तशा स्वरूपाचे लेखी पत्रही संबंधित विभागाकडे सुपूर्त करण्यात आल्याचेही केदार पतंगे यांनी स्पष्ट केले आहे.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.