loader
Breaking News
Breaking News
Foto

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

रत्नागिरी (जमीर खलफे) - सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीमय आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गुंबद मोहल्ला, सैतवडे येथील सामाजिक कार्यकर्ते, घुमटकर ग्रुपचे सदस्य नौशाद अब्दुल वाहिद भोबंल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नौशाद भोबंल यांना स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान स्वीकारण्याची विनंती केली असता, त्यांनी संस्थेच्या विनंतीचा मान राखत तत्काळ होकार दिला. नोकरीनिमित्त दुबई येथे वास्तव्यास असलेले नौशाद भोबंल सध्या सहकुटुंब सुट्टीसाठी मुंबई येथे आले असल्याचे समजताच संस्थेच्या वतीने त्यांना गुंबद-सैतवडे येथे येऊन ध्वजारोहण करण्याची विनंती करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

संस्थेच्या या विनंतीला मान देत, मुंबई येथे असतानाही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सहकुटुंब गुंबद-सैतवडे गाठले आणि शाळेच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून आपल्या शुभहस्ते ध्वजारोहण केले. त्यांच्या या कृतीतून गाव, शाळा आणि समाजाप्रती असलेली त्यांची आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी प्रकर्षाने दिसून आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg