loader
Breaking News
Breaking News
Foto

मानेज इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये देशभक्तीपर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत बालचमूंचे शानदार सादरीकरण

रत्नागिरी - प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित कुवारबाव, रत्नागिरी येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये आंतरशालेय फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पोदार जम्बो किड्स आणि मानेज इंटरनॅशनल स्कूल येथील बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मानेज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा व पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सबा पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या स्पर्धेसाठी देशभक्ती हा विषय देण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेमध्ये छोट्या स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. एकूण 34 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे. नर्सरीच्या क्लास मधून अनुक्रमे आयेशा सोलकर, श्रीयांश दामदार आणि शिरीष हे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. पूर्वी शिंदे हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. एल.के.जी. गटातून ओवी शेळके, सानवी जोशी, चिन्मय शेगडे यांनी पहिला दुसरा तिसरा क्रमांक प्राप्त केला तर महम्मद जयगडकर याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यु.के.जी. मधून अन्वी देसाई प्रथम, सलाह बोंद्रे द्वितीय, आणि आर्या आंगचेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. युवराज्ञी पाटील हिला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सानिका चाळके यांनी केले. मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या केले. सर्वच यशस्वी स्पर्धकांचे शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने व शाळेच्या व्यवस्थापिका ईशानी माने यांनी कौतुक केले. शाळेच्या शिक्षिका मनुश्री राणे यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg