loader
Breaking News
Breaking News
Foto

बज्म-ए-इमदादीयाच्या शाळांमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस स्थित बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.ए केजी एण्ड प्रायमरी व एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये हरघर तिरंगा उपक्रमानंतर शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक 07:50 वाजता प्रमुख पाहुणे डॉ.जावेद महाडीक सरांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थिनींनी वंदेमातरम तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन करताना कवायत प्रकारांचे संचलन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी 9:30 वाजता संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेची सुरुवात जैनब जोगीलकरच्या कुराण पठणाने करण्यात आली. सायमा चौगलेने नात-ए-पाकचे गायन केले. खान यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका कडवईकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ व स्मरणिका देऊन त्यांचे स्वागत केले. खेडेकर यांनी तंबाखू मुक्ती व साक्षरतेची शपथ देताना मागील सालांतील निरक्षर पालकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. प्रशालेतील विद्यार्थिनींनी ऊर्दू, मराठी व इंग्रजी भाषांमध्ये आपापले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.महाडीक यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून देताना सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब यांनी प्रमुख पाहुणे यांचे ऊर्दू माध्यमातून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून स्वप्न पूर्ण केल्याचे सांगताना संस्थेच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करताना भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. फरिहा जुईकरच्या आभारप्रदर्शनाने समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन अकसा कौचाली यांनी केले होते. यावेळी सर्व संस्थासदस्य, पालक, हितचिंतक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg