loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेक नागरिकांचे उपोषण व आंदोलन

रत्नागिरी : भारताच्या ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेकांनी उपोषण सुरू केल्याचे पाहायला मिळाले. प्रशासकीय अधिकारी समजवण्याचा प्रयत्न करत असले तरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. रत्नागिरी तालुक्यातील ओरी येथील प्रमोद देवदास जाधव यांनी स्थानिक रिक्षा चालकांकडून व्यवसाय करण्यास होत असलेल्या अटकावाविरोधात उपोषण मांडले. अधिकृत रिक्षा स्टॅन्डऐवजी अन्यत्र रिक्षा लावल्या जात असून आपल्यालाही व्यवसाय करू द्यावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसरीकडे, गवळीवाडा येथील इम्रान शेख यांनी राजापूर अर्बन बँकेने फसवणूक केल्याचा आरोप करत अधिकारी आणि संचालक मंडळावर कारवाईची मागणी केली. तसेच संगमेश्वर तालुक्यातील प्रवर्तक नियोजित श्रमप्रतिष्ठा मजूर सहकारी संस्थेचे मंगेश पवार यांनी तहसीलदार संगमेश्वर यांच्या मनमानी कारभारामुळे निवडणुकीपूव संस्था स्थापन करण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. याशिवाय, जयगड येथील तिहेरी खून प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पवार यांच्यावर कारवाई करावी यासाठी संध्या कोसुबकर व वंदना जंगम यांनी उपोषण केले.

टाईम्स स्पेशल

राजापूर तालुक्यातील आंबेरी कोळी साखर येथील संगीता धुमाळ यांनी गोड बोलून दागिने व पैसे उकळल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई करून आपले दागिने आणि पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली. तसेच संतोष मयेकर यांनी बहिणीने दागिने परत देण्यास नकार दिल्यामुळे आपल्या वयोवृद्ध आईसह उपोषणाचा मार्ग पत्करला. या सर्व आंदोलकांची प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईंनकर व पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली; परंतु आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच गदारोळ उडाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg