पुणे, : समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त आयोजित विशेष स्मृतिसोहळ्यात जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पना व प्रेरणेतून गेली अनेक वर्षे यशस्वीपणे सुरू असलेल्या ‘ब्लड इन नीड’ रक्तसेवेचा देशभर विस्तार करण्यात येत असून, त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऋणानुबंध- ‘ब्लड इन नीड’ मोबाइल ॲपचे भव्य लोकार्पण रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत महालक्ष्मी लॉन्स, पुणे-नगर रोड, खराडी, पुणे येथे होणार आहे. २ ऑक्टोबर २०११ रोजी सुरू झालेल्या या सेवेमार्फत आजपर्यंत २७,२८८ हून अधिक गरजू रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून त्यांच्या जीवन रक्षणासाठी मोलाची मदत करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित करण्यात आलेल्या ‘ऋणानुबंध-ब्लड इन नीड’ ॲपद्वारे गरजू रुग्ण, रक्तदाते, रक्तमित्र आणि रक्तपेढ्या यांच्यात तात्काळ समन्वय साधणे शक्य होणार असून, देशातील कोणत्याही भागात गरज असेल तेथे वेळेत रक्त उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे रक्ताच्या शोधात होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास प्रख्यात नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ अभिनेते व पर्यावरण संवर्धक सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुहास मोहनळकर, अंकित काणे, संपादक (मल्टिमिडीया) सकाळ माध्यम समूह तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राबविण्यात येणाऱ्या रक्तदान, देहदान, अवयवदान, विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, शिक्षण आदी विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ‘ब्लड इन नीड’ मोबाइल ॲपचे प्रात्यक्षिक सादर करून त्याच्या कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना दिली जाणार आहे.
समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज यांच्या २५ व्या पुण्यस्मरण वर्षानिमित्त आयोजित या स्मृतिसोहळ्यात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम, काकड आरती, महापूजा, भजन व संत-महंतांची समाजप्रबोधनपर प्रवचने होणार आहेत. दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत ‘ब्लड इन नीड’ सेवेच्या देशव्यापी विस्ताराची घोषणा व मोबाइल ॲपचे लोकार्पण होईल. सायंकाळी समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराजांच्या पादुकांची भव्य परिक्रमा, त्यानंतर संतांची प्रवचने आणि रात्री जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे प्रमुख मार्गदर्शनपर प्रवचन होणार असून, शेजारतीने कार्यक्रमाची सांगता होईल.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.