loader
Breaking News
Breaking News
Foto

शेर्ले येथे १५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

बांदा : (प्रतिनिधी) - श्री देव ईस्वटी संगीत विद्यालय, पाडलोस यांच्या वतीने गुरुवर्य अमेय तुकाराम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी १५ ऑगस्ट रोजी शेर्ले येथील सुरेश सातोसकर यांच्या निवासस्थानी कापईवाडी, शेर्ले येथे हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रमाणपत्र वितरण होईल. सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांचे तबला व पखवाज सोलो, ६ वाजता गुरुपूजन सोहळा व अल्पोपहार, ६.३० वाजता विद्यार्थ्यांचे गायन, तर रात्री ८ वाजता मान्यवर कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. संगीत संस्कारातून समृद्ध जीवनाची सुरुवात या उद्देशाने आयोजित उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg