सावंतवाडी (प्रतिनिधी) : 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळा क्र. ४ च्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण तिरंगा रॅलीचे आयोजन केले. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा संदेश देत संपूर्ण सावंतवाडी शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगवून टाकले.
शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही रॅली सावंतवाडी शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' च्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. विद्यार्थ्यांमधील हा उत्साह आणि राष्ट्रप्रेम उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी पदवीधर शिक्षिका अनघा अनिल निरवडेकर, उपशिक्षिका पूजा शिंदे, अंजना घाडी, दक्षता गवस, वर्षा नाईक, प्रणीती सावंत, उपशिक्षक महेश पालव, यांच्यासह चुनेकर, काळे, शिक्षिका शेख व इतर शिक्षिकांनी रॅलीत प्रत्यक्ष सहभागी होऊन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या योग्य नियोजनामुळे आणि शिस्तीत काढण्यात आलेल्या या रॅलीचे कौतुक होत आहे.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.