दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील पालगड येथे एका जावयानेच त्याच्या सासूचे ८ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून दापोली पोलिसांनी या जावयाच्या मुसक्या आवळल्या असून चोरी केलेला मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील पालगड कातळवाडी येथे राहणार्या शुभांगी विष्णू दळवी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४५ ते ९.१० या वेळेत घराला कुलूप लावून गुरे चरविण्यासाठी गेल्या होत्या. या वेळेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील मागील किचनचे स्लायडिंगच्या खिडकीतून घरात प्रवेश करून बेडरूममधील बेडवर ठेवलेल्या पिशवीतील दागिन्याची पर्स व त्यामध्ये ठेवलेले ७ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. दळवी यांनी या चोरीप्रकरणी संशयित म्हणून त्यांचे जावई विजय जयराम नामूगडे यांचे नाव दिले होते.
दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर दापोली पोलिसांनी नामुगडे याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सासूच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली व चोरलेले दागिने पोलिसांच्या हवाली केले. दापोली पोलिसांनी संशयित विजय जयराम नामूगडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) व ३०५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे करत आहेत.

1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.