loader
Breaking News
Breaking News
Foto

वानोशीत ’कृषी सखी’ गटातर्फे गो-कृपा अमृत अर्क प्रात्याक्षिक

दापोली, (सागर गोवळे) - वानोशी तर्फ पंचनदी ग्रामीण कृषी कार्य अनुभव उपक्रमांतर्गत वानोशी तर्फे पंचनदी येथील धातोंडी वाडीत सहाय्यक कृषी अधिकारी भावे आणि कृषी सखी गट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गो-कृपा अमृत अर्क तयार करणे व फवारणी’ या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकर्‍यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमा दरम्यान शेतकर्‍यांना गो-कृपा अमृत अर्क तयार करण्याची अचूक पद्धत, त्याचा फवारणीसाठी वापर, योग्य वेळ आणि जैविक शेतीमधील त्याचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रात्यक्षिका दरम्यान कृषी सखींनी शेतकार्‍यांना घटकांचा वापर करून द्रावण बनवून दाखवले. त्यानंतर हे मिश्रण सावलीत ७ दिवस ठेवून रोज नियमित ढवळणे गरजेचे असते. त्यानंतर ८ व्या ते २१ व्या दिवसापर्यंत हे द्रावण पिकांवर फवारणीसाठी तयार होते. तयार द्रावणाची पानांच्या दोन्ही बाजूंवर एकसमान फवारणी करावी. फवारणी नेहमी सकाळी ७:०० ते १०:०० किंवा संध्याकाळी ४:०० ते ६:०० या वेळेतच करावी. तीव्र उन्हात किंवा पाऊस सुरू असताना फवारणी टाळावी. तसेच वापरण्यापूर्वी फवारणी पंप स्वच्छ धुणे आवश्यक आहे असे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना भावे मॅडम यांनी सांगितले. हे प्रात्यक्षिक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ज्ञ डॉ. व्ही. जी. चव्हाण, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg