loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेश्वर मंदिरात तिरंग्याच्या रंगात सजला शिवकुणकेश्वर

देवगड - देवगड तालुक्यातील कोकणची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री कुणकेश्वराच्या शिवलिंगाची तिरंग्याच्या रंगातील फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या फुलांच्या सजावटीमुळे शिवकुणकेश्वर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे मनोहारी दृश्य भाविकांना पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून दोन दिवसांवर पहिला श्रावणी सोमवार असल्याने कुणकेश्वर येथे शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्याच्या विविध भागांसह बाहेरून आलेल्या भाविकांनी श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले. स्वातंत्र्य दिन आणि श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

टाईम्स स्पेशल

तिरंग्याच्या रंगात सजलेले शिवलिंग आणि मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरणामुळे कुणकेश्वर येथे आलेल्या भाविकांसाठी हा दिवस विशेष आकर्षणाचा ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg