loader
Breaking News
Breaking News
Foto

वॉडातील साफसफाई आणि दुरूस्ती कामांबाबत गुहागर नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांना निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष समीक्षा वराडकर यांनी वॉर्डातील साफसफाई आणि दुरुस्ती कामासंदर्भात गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गुहागर खालचापाट भंडारवाडी स्मशानभूमी जवळ असणार्‍या विद्युत पोल परिसरामध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच रात्री अपरात्री पोलावरील प्रकाश पडण्यास अडचण येतात तसेच काही भागात पोलावर लाईट अजून पेटत नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याच सोबत खालचापाट समुद्र किनारी बसण्यासाठी असलेली बाकडी तुटली असून दुरुस्त करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सौरभ भागडे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस उपाध्यक्ष समीक्षा वराडकर यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg