loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये आजी-आजोबांच्या सर्जनशीलतेला देशभक्तीची रंगत! आजी-आजोबांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

खेड, - (प्रतिनिधी) - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबा व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष ‘रांगोळी ऑफ पॅट्रिओटिसम’ रांगोळी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. १३ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेच्या परिसरात आयोजित या अभिनव स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतप्रेम या संकल्पनांवर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारल्या. रांगोळीच्या विविध रंगांतून सहभागी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कलात्मकतेसोबतच देशाविषयीचा अभिमान आणि प्रेमही व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेचे वैशिष्ट्‌य म्हणजे नातवंडांच्या शाळेत आजी-आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग पाहण्यास मिळाला. अनेक आजी-आजोबांनी आपल्या अनुभवातून व कलाकौशल्यातून सुंदर रांगोळी साकारत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सहभागामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून पिढ्यांमधील स्नेहबंध दृढ करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविणे, हा सुंदर संदेश देण्यात आला. रोटरी स्कूलच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे आजी-आजोबांच्या कलाकृतीतून तिरंग्याचा अभिमान आणि देशभक्तीचा रंग! असा अनुभव सर्वांना आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg