loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजोपयोगी उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा - डॉ. कुणाल जाधव

संगमेश्वर(सत्यवान विचारे)- मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांसाठी प्रथम सत्र कार्यशाळेचे आयोजन संगमेश्वर-लोवले येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजना चव्हाण यांनी डॉ. कुणाल जाधव यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कुणाल जाधव यांनी महाविद्यालयांनी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी प्रवृत्त करून विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्याबाबतचा सकारात्मक संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावा. तसेच उपेक्षित व वंचित घटकांसाठी विद्यार्थ्यांनी संवेदनशीलतेने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

कार्यशाळेत आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचा सामाजिक सहभाग आणि समाजोपयोगी कार्यक्रम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी दिशा मिळाली. यावेळी डॉ. सचिन राऊत, डॉ. किरण पाटील, डॉ. सुहास सोनवणे, डॉ. उमेश बागल, डॉ. संतोष खरे, नवनिर्माण महाविद्यालयाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख मितेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg