loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरण शाखा कार्यालय कर्जी व उपकेंद्र रजवेल येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात

संगलट(खेड) (इक्बाल जमादार) - प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खेड तालुक्यातील खारीपट्टा विभागातील विद्युत महावितरण शाखा कार्यालय कर्जी व उपकेंद्र रजवेल येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी कंपनीचा कणा असणारे जनमित्र यांच्यासोबत नेहमीच प्रत्येक कार्यात पुढे असणारे बाह्यस्त्रोत कर्मचारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपकार्यकारी अभियंता लोटे वेलमकर व महावितरण कार्यालय कर्जी यांच्या वतीने ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता सतत कामावर कार्यरत असणारे महावितरण कार्यालय कर्जी येथील कर्मचारी यांना प्रत्येकी एक बॅटरी देण्यात आली. तसेच रात्री अपरात्री रानातून फिरताना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तसेच काट्यांपासून व विजेच्या धोक्यापासून संरक्षण व्हावे यासाठी लवकरच गम बुट देण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपकेंद्र रजवेल येथील सुरक्षारक्षक मांडवकर यांनी परेड घेत ध्वजारोहणाची सुरुवात केली. राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला सलामी देण्यात आली. तसेच भारत माता की जय, स्वतंत्र दिनाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाखाधिकारी बडगुजर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना काळानुसार बदलणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सुरक्षित काम करणे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. योगेश लिंगायत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती देत महावितरण कार्यालय कर्जीचे नाव आणखीन उंचावेल यासाठी एकजुटीने प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त केले. शाखा अधिकारी बडगुजर यांच्या उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg