मालवण (प्रतिनिधी) - स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रम पार पडले. या अंतर्गत महाविद्यालयात सकाळी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण समारंभात एनएसएस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. ध्वजारोहणानंतर एन एस एस स्वयंसेवकांनी महाविद्यालय–धुरीवाडा ते कोळंब पूल या मार्गावर जनजागृती रॅली काढली. स्वयंसेवकांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी यासंदर्भातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीच्या माध्यमातून स्वच्छता राखणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
यानंतर २०२६–२७ या वर्षासाठी एनएसएसचे दत्तक गाव म्हणून निवडलेल्या कोळंब येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कोळंब ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वयंसेवकांनी श्रमदान करून स्वच्छता केली. यावेळी दत्तक गाव म्हणून एनएसएस विभागाला दिलेल्या सहकार्याबद्दल सरपंच सिया धुरी यांचा एनएसएस विभागाच्या वतीने कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत अधिकारी युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, संपदा प्रभू, संजना शेलटकर आणि नंदा बावकर यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य व प्रोत्साहन दिले. मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, तलाठी शिवलकर, कोतवाल पाताडे, आरोग्य विभागाचे डॉ. पवार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भूपेश ढोलम, जान्हवी कांदळगावकर आणि प्राची पेडणेकर, ग्रामस्थ प्रसाद भोजने यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
ग्रामपंचायत परिसरात राबविलेल्या स्वच्छता उपक्रमाबद्दल सरपंच सिया धुरी यांनी एनएसएस विभागाचे आभार मानले. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानातील ‘सेल्फी विथ तिरंगा’ या उपक्रमात सहभाग नोंदविला. या सर्व उपक्रमामध्ये एनएसएसच्या ३७ स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभाग घेतला. सर्व उपक्रमांचे नियोजन डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, गौतम मानवर, रिद्धी काजरेकर आणि अपूर्वा पालव यांनी केले.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.