खेड (प्रतिनिधी): कोकणी मुस्लिम संघ महिला विंगच्या वतीने दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी हाजी ए. एस. मुकादम हायस्कूल, बशीर हजवानी हॉल, खेड येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन खेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन समाजसेवक तथा खेड नगरपरिषदेचे नगरसेवक आरिफ मोहम्मद फकी मुल्लाजी यांनी प्रभावीपणे केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी शासनाच्या विविध आरोग्यविषयक सुविधा, रक्त तपासणी, आरोग्य तपासण्या तसेच उपलब्ध असलेल्या शासकीय आरोग्य योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अनेक नागरिकांना शासकीय आरोग्य सुविधांची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती आणि सुविधा पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला खेड नगरपरिषदेचे सर्व उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, शाळा प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, सर्व मान्यवर आणि नागरिक यांचे कोकणी मुस्लिम संघ महिला विंगच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येक नागरिकाला आरोग्यविषयक सुविधा आणि मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा निर्धार यावेळी कोकणी मुस्लिम संघ महिला विंगच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.