loader
Breaking News
Breaking News
Foto

केरच्या मिनी डॅम आणि ब्रीजसाठी निधी उपलब्ध करून देणार, आमदार दीपक केसरकर यांचे आमसभेत आश्वासन

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - केर गावातील बहुप्रतिक्षित मिनी डॅम आणि मुख्य रस्त्यावरील ब्रीज या दोन महत्त्वाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केर गावच्या विकासाला आणखी एक महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता असून, ग्रामस्थांमध्ये या आश्वासनामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केर गावातील पाणीप्रश्न तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मिनी डॅम आणि ब्रीजची कामे मार्गी लागावीत, यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच तेजस देसाई यांनी आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. संबंधित अधिकाऱ्यांना लगेचच सूचना दिल्या. यावेळी माजी सरपंच प्रेमानंद देसाई, ग्रामपंचायत सदस्य निलेश देसाई, माजी पोलीस पाटील तुकाराम देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम देसाई, ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील, जेष्ठ ग्रामस्थ शंकर देसाई आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन निधी मंजूर व्हावा आणि दोन्ही विकासकामांना लवकरात लवकर सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा केर ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg