दाभोळ (यशवंत कांबळे): यतीम खाना व मदरसा अंजुमन खैरुल इस्लाम ट्रस्टच्या अंतर्गत चालवल्या जाणार्या अंजुमन खैरुल इस्लाम सेमी इंग्लिश हायस्कूल दाभोळच्या इंग्लिश क्लबतर्फे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एका उत्साही इंग्रजी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जवळपास ५० विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा, प्रॉप्स आणि उत्कृष्ट हावभावांसह आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या दिमाखदार सोहळ्यात पालक, एसएमसी आणि एसएसआयडीसी चे सदस्य विशेष उपस्थित होते.
स्पर्धेच्या छोट्या गटामध्ये अहमद बामणे याने प्रथम, आयना बामणे हिने द्वितीय आणि जिदान बामणे व मोहम्मद साद हुसेन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर मोठा गटामध्ये मुस्कान मुकादम हिने प्रथम, झोया निलिक्कर हिने द्वितीय आणि महरीन दरवेश हिने तृतीय क्रमांक पटकावला. या प्रसंगी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकाची व्यवस्था केली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही संकोचाशिवाय विविध उपक्रमांमध्ये वाढदिवस किंवा स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे, कारण यामुळे विद्यार्थ्यांमधील उपजत गुण बाहेर येतात आणि ते आत्मविश्वासाने बोलू शकतात. त्यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे व मेहनतीचे देखील विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक इम्रान दाऊद खान यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक, पदके आणि प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. इंग्लिश क्लबच्या प्रमुख आफ्रीन शेख, मुस्कान अन्सारी आणि सजिहा मुलाजी यांच्या व्यवस्थापनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत परीक्षक म्हणून मोहम्मद साजिद आणि महपारा कादरी यांनी काम पाहिले, तर सूत्रसंचालन आफ्रीन शेख यांनी केले.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.