loader
Breaking News
Breaking News
Foto

दीप अमावस्येनिमित्त जांभेकर विद्यालयात दीपोत्सव उत्साहात साजरा

रत्नागिरी (जमीर खलफे) - सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात दीप अमावस्येनिमित्त दीपोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दीपोत्सवानिमित्त प्रशालेच्या परिसरात आकर्षक पद्धतीने पणत्या, समया व निरांजने प्रज्वलित करून दीपांची आरास करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या हस्ते प्रज्वलित केलेल्या दिव्यांना पुष्प अर्पण करून दीपपूजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी प्रशालेतील वातावरण प्रकाशमय आणि मंगलमय झाले होते. या वेळी मुख्याध्यापिका संजना तारी व प्रमुख पाहुण्या म्हणून शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. मजगावकर उपस्थित होत्या. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या साजरी करण्याची परंपरा आहे. पवित्र श्रावण महिन्याचे स्वागत, अंधकार दूर करून प्रकाश, सकारात्मकता व समृद्धीचे आगमन व्हावे, या मंगल भावनेतून हा सण साजरा केला जातो. उपक्रमाच्या आयोजनासाठी प्रयोगशाळा सहाय्यक सचिन साठे यांनी सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg