संगलट (खेड) (प्रतिनिधी) - गौरी गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी भरमसाठ भाडेवाढ केल्याने चाकरमान्यांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश भक्तातून नाराजी व्यक्त होत आहे. ही भरमसाठ दरवाढ कमी करावी अशी मागणी दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती व कोळबांद्रे गणाच्या सदस्या सौ. ममता शिंदे यांनी केली आहे. कोकणातील बहुतांशी चाकरमानी हे उदरनिर्वासाठी मुंबईमध्ये असतात. मात्र गौरी गणपती व होळीच्या सणाला ते आवर्जून गावी येत असतात. कोकणचा सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे गौरी-गणपती. वर्षभर मुंबईत कष्ट करणारा चाकरमानी या सणाची चातकासारखी वाट पाहत असतो. मात्र, यंदा गावी जाणार्या -येणार्या सामान्य मध्यमवर्गीय चाकरमान्यांसमोर महागाई आणि अचानक झालेल्या भाडेवाढीचे मोठे संकट उभे राहिले आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी तिकिटांच्या दरात फार मोठी वाढ केली असल्याची माहिती मिळत आहे. वाढपूर्वीचे भाडे: रू. ६०० सध्याचे वाढीव भाडे: रू. ९०० म्हणजे थेट रू.३०० ची वाढ करण्यात आली आहे. परिणाम: तिकिटाचे दर अचानक वाढल्यामुळे सामान्य प्रवाशांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. महिन्याला अवघा १० ते १५ हजार रुपये पगार मिळवणारा एक मोठा वर्ग मुंबईमध्ये आहे. ४ ते ५ जणांच्या संपूर्ण कुटुंबाला गावी घेऊन जाण्यासाठी फक्त जाण्या-येण्याचा खर्चच त्यांचा आता १० ते १५ हजार रुपयांच्या घरात जाईल. पगाराचा जवळपास अर्धा हिस्सा जर प्रवासातच संपला, तर गावी जाऊन सणाची खरेदी, पूजा आणि इतर खर्च कसा करायचा? हा मुख्य प्रश्न मुंबईकरांसमोर पडला आहे. पगार कपात आणि सुट्यांची दुहेरी अडचण ७ ते ८ दिवसांच्या सुट्या घेतल्यामुळे बहुतांश खाजगी कंपन्या किंवा आस्थापनांमध्ये चाकरमान्यांचा तेवढ्या दिवसांचा पगार कापला जातो. एकीकडे वाढीव तिकिटाचा खर्च आणि दुसरीकडे कापला जाणारा पगार, अशा दुहेरी कात्रीत चाकरमानी सापडला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स वालेही कोकणातले आहेत. त्यामुळे त्यांनी थोडी हमदर्दी व सहकार्याची भूमिका दाखवून सणासुदीच्या काळात करण्यात आलेली मनमानी भरमसाठ भाडेवाढ कमी करून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी विनंती वजा मागणी ममता शिंदे यांनी केली आहे.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.