loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वातंत्र्यदिनानिमित्त जी.जी.पी.एसमध्ये ट्राय सायकल रॅली

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. यावर्षी आपण भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७ साली देशाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्यांना वंदन म्हणून आणि स्वातंत्र्याचा आनंद म्हणून जी.जी.पी. एस च्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी’ विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये शाळेने ट्रायसायकल रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थी आपली सायकल घेऊन शाळेत उपस्थित होते. रॅलीची सुरुवात ‘भारत माता की जय’ या घोषवाक्याने झाली. याचबरोबर विद्यार्थी वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा परिधान करून आले होते, त्यांच्याबद्दल त्यांनी भाषणेही दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी गायली. आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे तिरंग्याच्या रंगाचे पदार्थ डब्यातुन आणले होते. तसेच तिरंग्याची चित्रे रंगवून वर्गांची सजावट केली होती.

टाईम्स स्पेशल

पालकांचा प्रचंड प्रतिसाद आणि सहकार्य या कार्यक्रमास लाभले. त्यामुळे कार्यक्रम खूपच उत्साहात पार पडला. याचबरोबर या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या अपूर्वा मुरकर, प्री प्रायमरी विभागाच्या शुभदा पटवर्धन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg