loader
Breaking News
Breaking News
Foto

बांग्लादेश बनविले, सिक्कीम मिळविले आणि गोवा राज्याला स्वतंत्र केले. नेहरु-इंदिरा यांच्या कार्यावर खडगे यांचा प्रकाशझोत

नवी दिल्ली - लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी स्वतंत्रता दिवस निमित्त केलेल्या भाषणाबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी हल्लाबोल केला आहे. आधुनिक भारतात भारत आणि विकासामध्ये ९० टक्के योगदार काँग्रेसचे आहे. काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जु खडगे यांनी पहिले पतंप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी देशासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला. नेहरु यांनी आधुनिक लोकतांत्रिक आणि धर्मनिरपेक्ष भारताचा पाया रचला. त्यांनी आयआयटी, आयआयएम आणि सार्वजनीक क्षेत्रातील उपक्रमांचा पाया रचला. लालबहादूर शास्त्री यांनी देशात हरित क्रांतीचा पाया रचला. इंदिराजी यांनी भारताला सैन्य आणि रणनिती क्षमतांमध्ये मजबूत केले. बांग्लादेश निर्माणमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. ते म्हणाले, लाल किल्ला येथून कोणी व्यक्ती दावा करत असेल, की सर्व काही आम्ही केले तर हे सौभाग्यपूर्ण सांगू शकत नाहीत, की देशामध्ये जे काही आहे ते त्यांनीच केले. आजचा जो विकास आहे. त्यामध्ये काँग्रेसचा ९० टक्के वाटा आहे. मोदी यांनी राममंदिर ट्रस्ट बनविला आणि त्यात आपले लोक नियुक्त केले. असे अनेक मुद्यांवर खडगे यांनी आपले विचार मांडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg