loader
Breaking News
Breaking News
Foto

अलिबागमध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा

अलिबाग, (वार्ताहर) - श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा अलिबाग येथे साजरा करण्यात आला. नामदेव महाराजांच्या मूर्तीचे पूजन विलास डोळस व सौ.नीता डोळस या उभयतांच्या हस्ते झाले. संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाची महती पंजाबपर्यंत वाढवली. आयुष्याची बरीच वर्षे त्यांनी पंजाब मध्ये राहून वारकरी संप्रदायाची महती येथील लोकांना पटवून दिली. नामदेव महाराज यांनी जनजागृती केली. त्यांनी रचलल्या अभंगातून त्यांची पांडुरंगा प्रति असलेली श्रद्धा, भक्ती याची प्रचिती येते. अलिबाग मधील संत नामदेव शिंपी समाज मंडळ गेली अनेक वर्ष नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करीत आहे. यावर्षी ११ ऑगस्ट रोजी हा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने अलिबाग शहर आणि परिसरात असलेल्या समाज बांधवांना एकत्र येण्याची संधी मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या सुरुवातीला धार्मिक विधी पार पडले. श्री संत नामदेव महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. समाज मंडळाची वार्षीक सर्वसाधारण सभा, दुपारच्या सत्रात बालवाडी ते इ.दहावी, बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त सौ.नीता डोळस यांना सेक्रेटरी सौ.सूचीता ढवळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला. खजिनदार किशोर राऊत यांनी जमा खर्च सादर केला तसेच समाज मंदिर बांधकामासाठी देणगी द्यावी असे आवाहन केले. सेक्रेटरी सौ.सूचिता ढवळे यांनी उपस्थित ज्ञाती बंधू भगिनींचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg